Saturday, September 6, 2014

नित्य सदगुरू स्मरण प्रार्थना - Daily Prayer of Guru

हे समस्त श्री वासुदेवा
हे अनंत कोटी ब्रम्हांड नायका सगळीकडे तूच आहेस रे...
हे जग नव्हे जगदीश आहेस
हे जन नव्हे जर्नादन आहेस
हे विश्व नव्हे विश्वंभर आहेस
तू सगळीकडे आहेस म्हणून हे सद्गुरूराया
तू सर्वांना चांगली बुद्धी दे
अशी बुद्धी जी तुला सन्मुख असेल
ती तुझेच ध्यान करणारी असेल
ती तुझेच स्मरण करणारी असेल
तुझेच ध्यान घेणारी असेल
तुझे गुणगाण करणारी असेल
तुझे भजन करणारी असेल
तुझ्यावर प्रेम करणारी असेल
तुझे अनुसंधान करणारी असेल
तुझी जवळीक करणारी आणि तुझ्याशी एकरूप होणारी बुद्धी दे...
हे माऊली...
तू सर्वांना चांगले आरोग्य दे
शरिराचे आणि मनाचे
कारण या शरिराचा निर्माता तूच आहेस
तू निर्माण केलेली सर्वांग सुंदर अशी दिव्य व्यवस्था आहे
या शरिराचा चालक; मालक तूच आहेस
याचा निर्माता ही तूच आहेस
म्हणून हे शरिर सुंदर आणि सुदृढ ठेव; सशक्त ठेव
आरोग्य संपन्न ठेव
या शरिरात वास करणारे मन सुंदर सुंदर विचारांनी भरून आणि भारून जाऊ देत
आणि सगळीकडे तूच आहेस याची प्रचिती येवू देत
हे सदगुरूराया सर्वांना सुखात ठेव
तू सर्वांना आनंदात ठेव
तू सर्वांना ऐश्वर्यात ठेव
तुझ्या सहवासात सगळीकडे आनंदाची उधळण होऊ दे
जे जे चांगले; जे जे उत्तम; जे जे सुंदर; जे जे योग्य; जे जे सुखकारक ते तू सर्वांना दे
सर्वांची भरभराट कर
सर्वांना ऐश्वर्य संपन्न बनवं
सर्वांना समृद्ध कर
तुझ्या परिस स्पर्शाने सर्वांचे जीवन सुखकर होऊ दे
सर्वांना वैभवशाली बनवं
सर्वांच भलं कर
तू सर्वांच कल्याण कर
तू सर्वांच रक्षण कर
तू सर्वांचे संसार सुखाचे कर
आणि तुझे गोड गोड गोड नाम मुखात अखंड राहू दे
सदगुरूनाथ महाराज की जय...
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

No comments:

Post a Comment

Contributors